ब्रुक फार्मा..राजेश डोकानिया याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर भाजप का घाबरली?,

मुंबई | रेमडेसिवीरची साठेबाजी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील संपूर्ण भाजप का घाबरली?,राजेश डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. यावरून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

दमणच्या ब्रूक फार्मा या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती.  मात्र शनिवारी मुंबई पोलिसांनी अचानक ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतलं.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या मालकाचं वकीलपत्रं घेतलं होतं की त्यांचे लागेबांधे होते म्हणून त्यांची बाजू घेत होते, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हान नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे.

फडणवीस पेशाने वकील आहेत. ते डोकानियांची वकीलपत्रं घेऊन बाजू मांडत होते की त्यांच्याशी संबंध आहेत म्हणून बाजू मांडत होते?. विरोधी पक्षनेत्यांचा डोकानियाशी संबंध काय? असा सवाल मलिक यांनी केला.