रेमडेसिवीरचा तुटवडा केवळ मोदी सरकारच्या धोरणामुळेच:एकनाथ खडसे


मुंबई ( प्रतिनिधी ) रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. मात्र हा तुटवडा केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे आहे. आपले लोक संकटात असताना या इंजेक्शनची निर्यात करण्यात येत होती. ही निर्यात करण्यात आली नसती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. मात्र आपले पेशंट मेले तरी चालतील पण जगात आपलं नाव करण्यासाठी परवापर्यंत या इंजेक्शनची निर्यात सुरू ठेवली होती असंही खडसे यांनी म्हतलं आहे
भाजपमध्ये ही अनेक आमदार नाराज आहे. त्यांची नाराजी कमी करण्यासाठी पुन्हा आपलं सरकार येणार असल्याचा आशावाद फडणवीस त्यांच्या आमदारांना देत आहेत. मात्र हे सरकार पडणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. मात्र त्यांना याच ज्ञान नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. .देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राम्हण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरे ठरतं नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. खडसे म्हणाले की, सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं त्यांना रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत.
त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत. ते ब्राम्हण असल्याने त्यांचं भाकीत खरे ठरेल असं मला वाटत होतं. सध्याच्या काळात राजकारण बाजूला ठेवत एकमेकांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना त्यांनी आपणही विरोधी पक्षात असताना राज्य अडचणीत असताना सरकारला मदतीची भूमिका घेतली होती, मात्र सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांकडून ते बघायला मिळत नाही, असं खडसे म्हणाले.