इस्रायल कोरोनामुक्त होणारे पहिले राष्ट्र


नवी दिल्ली | देशाने जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाला नमवले आहे. इस्रायलचे आरोग्यमंत्री यूली इडेलस्टेइन यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणानंतर या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. त्यामुळेच निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तरीही इथे कार्यालयांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. जवळपास 93 लाखांची लोकसंख्या असणाऱ्या या देशाने आतापर्यंत 50 लाखहून अधिक जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली आहे. इस्रायलमधील टळणारे हे संकट पाहता इथे शाळाही सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. तर, येत्या काळात इथे पर्यटनासही नव्याने सुरुवात करण्यात येणार आहे. सारे जग कोरोनाशी लढत असतानाच आता हे अतिशय आनंदाचे आणि दिलासादायक वृत्त सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित आणत आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनारूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ऑक्सिजन आणि बेडची समस्या उद्धावली आहे. त्यामुळे कोरोनाची दहशत पसरली आहे. मात्र अशातच इस्रायल देशाने कोरोनावर पुर्णपुणे मात केली आहे. इस्रायलने जवळपास एक वर्षभरानंतर देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. रविवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तरीही इथं कार्यालयांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे. जवळपास 93 लाखांची लोकसंख्या असणाऱ्या या देशानं आतापर्यंत 50 लाखांहून अधिक जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली आहे. इस्रायलचे आरोग्यमंत्री यूली इडेलस्टेइन यांनी दिलेल्या माहितीनुसार लस दिल्यानंतर संसर्गाचं प्रमाण कमी झालं.
कोरोना लसीकरणानंतर इस्रायलमधील परिस्थिती बदलण्यास सुरूवात झाली. लसीकरणानंतर इस्रायलमधील कोरोनारूग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली. तर दिवसाचा मृतांचा आकडाही मोठ्या प्रमाणाता कमी झाला. इस्रायलमधील टळणारं हे संकट पाहता इथं शाळाही सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. तर येत्या काही दिवसांमध्ये पर्यटनही नव्या सुरू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, जानेवारीमध्ये दिवसाला 10 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधिकत रूग्ण आढळत होते. आत हाच आकडा 100 आणि 200 वर पोहोचला आहे. इस्रायलने देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केेले आणि याचाच त्यांना फायदा झाला. इस्रायलप्रमाणे भारतातसुद्धा नागरिकापर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायवा हवेत जेणेकरून आपणही कोरोनावर मात करू शकतो.