भाजप खासदार गौतम गंभीर च्या अडचणींत वाढ

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कोरोनानं देशभरात थैमान घातलं आहे. यातच आता माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरच्या अडचणींत वाढ झाली आहे. औषध नियंत्रक विभागानं गुरुवारी उच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत दिल्ली सरकारच्या औषध महानियंत्रकांनी गौतम गंभीर फाऊंडेशन कोविड 19 औषधांची अवैध साठेबाजी आणि वितरण प्रकरणात दोषी आढळल्याचं सांगितलं

.कोर्टानं ड्रग कंट्रोलरला सहा आठवड्यांत या प्रकरणांमधील प्रगती आणि सद्यस्थितीबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणीसाठी 29 जुलै ही तारीख निश्चित केली आहे.दरम्यान, न्यायालयानं औषध महानियंत्रकांना चौकशीचे आदेश दिले होते

ड्रग कंट्रोलर’नं न्यायालयात म्हटलं की, फाउंडेशन आणि औषध विक्रेत्यांविरूद्ध वेळ न घालवता कारवाई केली पाहिजे. औषध नियंत्रकांनी हायकोर्टाला सांगितलं की, ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यांतर्गत आमदार प्रवीण कुमार यांनाही अशाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं आहे.

. या चौकशीच्या अहवालात आरोपींना क्लिन चीट देण्यावरून न्यायालयानं औषध महानियंत्रकांवर चांगलेच ताशेरे ओढले होते. तसंच पुन्हा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले होते.

Latest News