माथेफेरू रणदीप हुड्डा याच्या विरोधात ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा:- संदीप ताजणे

PicsArt_06-05-10.57.50

मुंबई: बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या विरोधात अभिनेता रणदीप हुड्डा याने अश्लील व बेताल वक्तव्य केले. त्याने असे वक्तव्य आणि ट्विट करून देशातील कोट्यवधी बहुजन समाजाचा अपमान केला आहे. हे जातीयवादी तसेच मनुवादी मानसिकता असलेले लोक आहेत. ते आमच्या बहुजन समाजातील महापुरुषांचाही वारंवार अपमान करीत आलेले आहेत. हे लक्षात घेत माथेफिरू रणदीप हुड्डा याच्यावर एससी, एसटी अन्याय व अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून त्वरित अटक करावी

. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता रणदीप हुड्डा याच्या विरोधात ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला अटक करावी; अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र बसपचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला.अॅड. ताजणे यांनी निवेदनात म्हटले,तसे न केल्यास राज्यात बसप तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही ताजणे यांनी निवेदनात दिला आहे.

Latest News