लॉकडाऊनबाबत जो निर्णय घेतील तो मुख्यमंत्रीच घेतील…


पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या आसपास आहेे आणि पुणे ग्रामीण भागात पॉझिटिव्हीटी रेट 12 टक्क्यांच्या आसपास होते. लॉकडाऊनबाबत जो निर्णय घेतील तो मुख्यमंत्रीच घेतील. याबाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.पुण्यात सध्या बंद असलेले सलून, व्यायामशाशाळा आणि ब्युटी पार्लर उघडण्याबाबतसुद्धा सोमवारीच निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबवरही त्यांनी आपलं मत मांडलं. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत नियोजन सुरु आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपाचाराची बिलं भलीमोठी येत होती पण आता सरकार रुग्णालयात या रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. तसंच खासगी रुग्णालयांनाही दर ठरवून दिले आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असंही अजित पवार यांनी सांगितलं.राज्यातील प्रमुख शहर असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रूग्णसंख्यांची संख्या कमी झाली आहे. मागील काही दिवसांपुर्वी कोरोनाचं हॉटस्पॉट शहर ठरलेल्या पुण्याचा रिकव्हरी रेट संपूर्ण देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्यात अनलॉक होणार असल्याचं बोललं जात आहे. यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.दरम्यान, सोमवारपासून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी शिथिलता होणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने पुणे, पिंपरी चिंचवडचा लॉकडाउन अधिक शिथील.