पुणे महानगरपालिकेचे 7 जून पासून नवी नियमावली…

PicsArt_06-05-10.29.34
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारपासून नवी नियमावली लागू होणार असल्याचं अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट

पुणे | सोमवारपासून पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50% क्षमतेने सुरू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पुण्याची जीवनवाहिनी पीएमपीएमएल बस सेवा सोमवारपासून 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहे.महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारपासून नवी नियमावली लागू होणार असल्याचं अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करून स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रासह पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही गेल्या दोन महिन्यांपासून झपाट्याने वाढली होती. परंतु, आता गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने पुणे शहरातील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वीकेंड लॉकडाऊन हा हटवण्यात आला त्यानंतर शहरात नागरिकांना व व्यापाऱ्यांना दुपारी 2 वाजेपर्यंत लॉकडाऊनमधून शिथिलता देखील देण्यात आली.त्याबरोबरच पुणे महापालिका क्षेत्रातील सामाजिक, धार्मिक व मनोरंजनपर कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50 लोकांच्या उपस्थितीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये संध्याकाळी 5 वाजेनंतर कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू असणार आहे. तसेच दिवसा 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असणार आहे.पुण्यात खुली मैदानं तसेच सार्वजनिक ठिकाणची उद्यानं आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.

पुण्यातील लोकल रेल्वेमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व आरोग्य सेवेत असणारे कर्मचाऱ्यांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी असणार आहे, इतरांना प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेत न येणार्‍या आस्थापना या सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शनिवार व रविवार फक्त अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी राहील.

Latest News