पुण्यात आत्ता घरोघरी जाऊन कोरोनाचे लसीकरण होणार

images-2021-06-05T223631.927

पुणे | केंद्र सरकारनं आता खाजगी संस्थांना व हॉस्पिटलला लसीकरण करण्यास परवानगी देण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच अनुषंगानं पुणे शहरात प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे

.सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या मोहिमेअंतर्गत 12 डॉक्टर, 38 नर्सेस, 120 व्हेंटीलेटर, 6 अॅब्युलन्स या यंत्रणेच्या सहाय्यानं एकूण 12 मोठ्या व 48 लहान सोसायटींमध्ये एका दिवसात सुमारे 4 हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. देशात सध्या लसीकरणाला वेग आला आहे.दरम्यान, 18 वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांपर्यंत लसीकरण पोहचवण्याच्या दृष्टीनं काम सुरू केलं आहे. खराडी आणि विमाननगर परिसरात सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

Latest News