पुणे शहरातील दैनंदिन स्वरुपाच्य सर्व व्यवहारांना परवानगी: अजीत पवार उपमुख्यमंत्री

maharashtra-times

पुणे : पुणेकरांना आता जिल्हाबंदी नसून ते आवश्यक ठिकाणी ई-पासशिवाय प्रवास करु शकतील. पीएमपीएलएम बससेवा 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. तर बँका आणि सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांचे काम आठवडाभर सुरु राहणार आहे.पु्ण्यात अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं

. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यामुळे पुण्यात पुन्हा गर्दी होत असल्याचं दिसत आहे. यावर अजित पवारांनी चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “गर्दी झाली तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात.

व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे, त्याबद्दल लक्ष द्यावे. अन्यथा आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका. लोक कंटाळली आहेत. लोकांची कामे रखडली आहेत, त्यामुळे बाहेर पडत आहेत. पण करोना संकट दूर झालेलं नाही. जर गर्दी वाढत राहिली

, तर एका बाजूची आज आणि दुसर्‍या बाजूची उद्या अशा पद्धतीने दुकाने सुरू करण्याची वेळ आणू नका. त्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. बाहेर पडताना, नियमांचे पालन करावं,” असं आवाहन अजित पवार यांनी केलं

.पुणे शहरात येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. शहरातील दैनंदिन स्वरुपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा मिळणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु ठेवता येणार असले, तरी संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदीचा आदेश लागू असेल.

Latest News