पुण्यात करोना निर्बंध कायम: उपमुख्यमंत्री अजीत पवार


.पुणे : महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या हळू-हळू कमी होत आहे. त्यामुळे आताकुठं कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पुण्यात निर्बंध राहणारच असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले
राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारले आहेच. त्यामुळे करोनाची तिसरी लाट आली तर आपण सज्ज असल्याचही त्यांनी म्हटलं.अशातच पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचा कोरोना आढावा घेत एक वक्तव्य केलं आहे. पुण्यात यापुर्वी होते तेचं निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 4 दुकाने सुरू राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे जिल्ह्यात करोना रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या दिलासा नाही. त्यामुळे पुणेकरांनाही दिलासा नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आज अजित पवार यांनी पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला भेट दिली. त्याठिकाणी नव्यानं उभारण्यात आलेल्या सुविधा व साधनसामग्रीचा आढावा घेतला. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.सगळीकडे कोरोनाची तिसरी लाट सरु आहे
दरम्यान, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 30-31 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पुण्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचीही शक्यता वर्तवली.