कुठल्याही वेळी देशात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात:ओमप्रकाश चौटाला

भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील प्रत्येक नागरिक दु:खी आहे. मला असे दिसते की देशातील लोकांना 2024 ची वाट पाहावी लागणार नाही. कुठल्याही वेळी देशात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं ओमप्रकाश चौटाला यांनी म्हटलंय

2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव होईल असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. अशात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांनी मोदी सरकार 2024 आधीच कोसळेल, असं भाकित वर्तवलं आहे

.भाजप-जजपा सरकारही 2024 पर्यंत सत्तेत टिकणार नाही. ही आघाडी पूर्णपणे कमकुवत झाली आहे. आमदारांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. इंडियन नॅशनल लोकदल सोडून गेलेल्या लोकांना आता त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे, असं ओमप्रकाश चौटाला म्हणालेत.

इतर पक्षांमध्ये तिकीट पैशांवर मिळते. मात्र इंडियन नॅशनल लोकदल पक्षामध्ये तिकिांचे वाटप जनता करते. हरियाणामध्ये भय आणि भ्रष्टाचाराचं वातावरण आहे. इंडियन नॅशनल लोकदल पुन्हा सत्तेत आल्यास शिक्षण आरोग्य, रोजगार यासाठी सरकारचे धोरण ठरवले जाईल