पुण्यात पूर्ववैमनस्यातून दोघां भावडांवर कोयत्याने वार…

पिंपरी : तुझ्या मित्रांनी भांडण सोडविले होते, आता तुझ्याकडे बघतोच, असे म्हणत लपविलेला कोयता काढून वार केला. त्यावेळी तुषारचा मोठा भाउ आशिषने मध्यस्थी केली असता, आरोपींनी त्याच्यावरही कोयत्याने वार केला. त्याशिवाय तुषारचा मित्र ऋतुराज मोरे वय 18 यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. या प्रकरणी खडक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तुषार कुंदुर (वय 18) आणि आशिष कुंदुर (वय 20 दोघेही रा. गणेश पेठ, मेनकर वाडा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून दोघांनी भावडांवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना शहरातील मध्यवर्ती गणेश पेठेत घडली.

Latest News