चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं फेसबुक अकाऊंट हॅक


पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं समोर…हॅक झालेल्या फेसबुक अकाऊंटवरुन ) वैयक्तिक मेसेज पाठवून पैसे किंवा इतर वस्तूंची मागणी केली जात आहे. फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त पोस्ट किंवा पैशांची मागणी करणे, असे प्रकार घडल्यास, कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी ट्विटरद्वारे केले आहे
. जगताप यांच्या नावे सोशल मीडिया अकाऊण्टवरुन पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आपल्या अकाऊण्टवरुन होणाऱ्या हॅकर्सच्या कोणत्याही मागण्यांना उत्तर देऊ नका, असं आवाहन लक्ष्मण जगताप यांनी केलं आहे.
कोण आहेत लक्ष्मण जगताप?
लक्ष्मण जगताप पिंपरी चिंचवडमधून भाजपचे आमदार आहेत. 2009 ते 2014 या काळात जगताप चिंचवड मतदारसंघातून अपक्ष आमदार होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांनी शेकापकडून श्रीरंग बारणेंविरोधात शड्डू ठोकला होता, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून मैदानात उतरले.