पार्थ पवार फाउंडेशन तसेच कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान च्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धाचा सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर , पार्थ पवार फाउंडेशन तसेच कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान च्यावतीने पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास कार्यालयात उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त

कोरणा महामारी च्या प्रसंगी ज्या गोरगरीब दीनदलित यांना जी मनापासून सहकार्य केलं व त्यांना कुठल्या प्रकारचे ह्या महामारी मध्ये कुठलीही गरज न विचारता त्यांना सर्व परे मदत केल्याबद्दल अशा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा माननीय संजोग वाघेरे (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिं.चि.शहर) यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रशांत शितोळे (कार्यअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )राजेंद्र जगताप( मा.नगरसेवक पिं.चि.मनपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि )शिवाजी पाडळे ( स्विकुत नगरसेवक )अरुण पवार (अध्यक्ष मराठवाडा जनविकास संघ ) श्यामभाऊ जगताप (युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )तानाजी जवळकर (युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) उज्वला ढोरे (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिं.चि.)अमरसिंह अदियाल (युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )शिला भोडवे (महिला बचत महासंघ) अजित काळभोर (मा.नगरसेवक ) यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी संजोग वाघेरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना

आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब व अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केले ते खरोखरचे मोलाचे आहे.आज जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीकाही करोना च्या महामारी मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांना मदत केली ती खरोखरच उल्लेखनीय आहे . आज खरोखरच या महागाईच्या काळात गोरगरीब दीनदलित त्यांना मदत करणे अत्यंत जरुरीचे आहे खरोखरच जे मदत मानवाला करतात त्यांच्यासाठी ते देवदूत म्हणून येतात असे असे मनोगत सत्कार प्रसंगी केले. यावेळी पुरस्कार्थी अरूण पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस करोनायोध्दा पुरस्कार देण्यात आला त्यामुळे माझ्या सारख्या कार्यकर्तेचे मनोबल व काम करण्याची स्फूर्ती मिळाली असुन मी यापुढील कालावधी मध्ये गरीब दिनदलीतानां मदत करण्यासाठी सदैव बांधली राहील.

यावेळी प्रमुख उपस्थित वैशालीताई काळभोर, लक्ष्मीकांत शास्त्री ,रोहन शिंदे,अक्षय कळसकर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक रविंद्र बाईत व कार्यक्रमाचे आभार संयोजक अस्मिता कांबळे यांनी मानले.

Latest News