फडणवीस पुण्याच्या विकासाचे शिल्पकार,हा सगळ्यात मोठा जोक : आमदार अमोल मिठकरी


पुणे : पुण्यातील देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देणारं आहे. त्यावर मोठ्या एका कॅप्शनवरुन अमोल मिटकरींनी टीका केली आहे. त्या कॅप्शनमध्ये फडणवीसांना पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहेआता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त, असं अमोल मिटकरी यांना आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अमोल मिटकरींनी लगावलेल्या टोल्यावरून भाजप काय प्रत्युत्तर देतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्यातील फ्लेक्स नेहमीच चर्चेत विषय ठरतात. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसही एकाच दिवशी असतो. राज्यभर सध्या त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकताना दिसत आहेत. कार्यकर्ते आपल्या नेत्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी वाढदिवसाला काही शिबिर आयोजित करतात.येत्या 22 जुलैला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे.
हे दोन्ही नेते राज्याच्या राजकारणातील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे वाढदिवसानिमित्त राज्यभर त्यांना शुभेच्छा देणारे प्लेक्स लावण्यात आले आहेत. अशाच शुभेच्छा देणाऱ्या पुण्यातील एक फ्लेक्सवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.