पिंपरी चिंचवड महापालिकेत पदोन्नती व बदल्यामध्ये प्रशासन व सत्ताधारी भाजप नें मारला करोडो रूपयाचा डल्ला

पिंपरी चिंचवड महापालिकेत पदोन्नती व बदल्यामध्ये प्रशासन व सत्ताधारी भाजप नें मारला करोडो रूपयाचा डल्ला

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत नवीन आयुक्त राजेश पाटिल यांनी पदभार घेतल्यापासून कार्यकारी आभियंता, उपाभियंता, सह शहर आभियंता या पदाच्या प्रशासनने तात्काळ पदोन्नती केल्या आहेत त्या मध्ये सत्ताधारी भाजपा पदाधिकारी, व प्रशासनातील काही निवड अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्येक पदासाठी लाखोचा रेट ठरवून घेतल्याची चर्चा पालिकेत सुरु आहे. या सगळ्या पदोन्नती मध्ये काही कोटी रूपयाची उलाढाल झाल्याची माहिती मिळत आहे

शासनाच्या मे 2021 च्या नवीन आदेशानुसार नुसार 2004 च्या सेवाजेष्ठता यादी नुसार मागील महिन्यात पाच कार्यकारी आभियंता पदाची DPC बैठक झाली होती, त्यानुसार त्याची ऑर्डर हि तयार होती मात्र काही आर्थिक हितासाठी झालेली बैठक हि प्रसाशनाने रद्द केली,
तसेच 27 उपाभियंता व पाच कार्यकारी अभियंता यांच्या बदल्या केल्या होत्या, त्या मध्ये प्रशासनाने अनेक वर्ष एकाच ठिकाणी ठाण मधून बसलेले अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बदल्या केल्या होत्या, ज्यां अधिकाऱ्यांची बदल्या होणे अपेक्षित होत त्याच्या झाल्याच नाहीत मात्र काही अधिकाऱ्यांना कार्यकाळ पूर्ण न होता त्याच्या भाजपा आणी प्रशासनाच्या फक्त आर्थिक हितासाठी बदल्या केल्या असल्याची चर्चा पालिकेत सुरु आहे

12 जुलै 21 ला पुन्हा त्याच पदाच्या DPC बैठक घेऊन पदोन्नती बाबत शासन आदेशाचा भंग करून जो जास्त पैसे देईल त्याला पदोन्नती देण्याचा घाट सत्ताधारी भाजपा व प्रशासन अधिकारी यांनी घातला आहे.त्या मध्ये नवीन अधिकारी यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतल्याची पालिकेत दबक्या आवाजात सुरु आहे.

आता अजून पालिकेत स्थापत्य सहाय्य्क यांना कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती देण्याबाबत हालचाली सुरु आहेत मात्र काही आर्थिक व्यवहार जुळत नसल्याने DPC बैठक दोन वेळा कॅन्सल झाल्याची चर्चा सुरु आहे… या सगळ्या सर्व प्रकारणात सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी सक्रिय झाले असून खूप मोठा हात मारल्याची नाराज अधिकारी व कर्मचारी सांगत आहेत..

Latest News