भोसरी पोलीस स्टेशनंला जात पंचायतीविरुद्ध गुन्हे दाखल

पिंपरी : पुरोगामी अशी ओळख असलेल्या आपल्या राज्यात अजूनही जात पंचायतीचा जाच सुरूच असल्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. घरगुती वाद सोडविणसाठी तब्बल 15 लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना समोर आली आहे. तसंच, दंड भरला नसल्याचं कारण देत पंचांनी आपल्याला कंजारभाट समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याचा दावा पीडित व्यक्तीने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील इचलकरंजी इथला रहिवासी असलेल्या सुशांत नगरकर याने  जात पंचायतीविरुद्ध तक्रार देत आपल्यावर अत्याचार झाल्याचं म्हटलं आहे

चिंचवडमधील एम.आय.डी.सी भोसरी पोलिसांनी दहा जणांविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण अधिनियम 2016 नुसार  गुन्हे दाखल केले आहेत. प्रशांत उर्फ विकी गागडे, संगीता गागडे, शुभम गागडे, छोटू गागडे, विजय गागडे (जात पंचायत अध्यक्ष ,रा.येरवडा पुणे) गुल्या आबांगे (पंच), सूर्यकांत माचरे(पंच), शशिकांत गागडे(पंच), बबलू तामचिकर(पंच), सुभाष माचरे(पंच) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून पोलीस या सर्वांचा शोध घेत आहेत

. साधारण 6 महिन्यापूर्वी हा प्रकार घडला होता. तेव्हाच आपण पोलिसांना तक्रार दिली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने सुशांत याने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली आणि अखेर आज या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला


असून आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल आणि दोषी आढळणाऱ्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली आहे.

नगरकर यांने पुरावा म्हणून पोलिसांकडे एक व्हिडिओ सादर केला आहे. ज्यामध्ये पंचायत बसल्याचे दृश्य दिसत आहे. ह्या पंचायतीच्या समोर सुशांतला उभं केलं असता आधी पंचायतीची  5 हजार रुपयांची फी भरण्यासाठी सांगण्यात आलं.

मात्र, त्यासाठी सुशांत नकार दिला तेव्हा पंचांनी त्याची बाजू ऐकून न घेता मुलीच्या बाजूने एकतर्फी निकाल दिला आणि 15 लाखाचा दंड न भरल्यास समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून आपल्याला समाजातील  कोणत्याही समारंभात बोलवलं जात नसल्याच  सुशांतचं म्हणणं आहे.