राज्यात झिका विषाणूचा पहिला रूग्ण पुण्यात सापडला…


पुणे : झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिली आहे.राज्यात झिका विषाणूचा पहिला रूग्ण पुण्यात सापडला आहे. पुरंदर तालूक्यातील बेलसर या ठिकाणी झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी दिली
झिकाचे पहिलं लक्षण म्हणजे ताप येणं, अंगदुखणं, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणं तसेच या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरसचे प्रमुख लक्षण असल्याची माहिती समोर आहे.
सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात