कोणी थप्पड मारण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारू की परत उठणार नाही: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : मुंबईसाठी मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. स्वत:ची घरे झाल्यावर कोणी मोहाला बळी पडू नका, असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या चालूच आहेत. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना पुन्हा तिखट शब्दात गंभीर इशारा दिला आहे. आम्हाला कोणी थप्पड मारण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आज वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.महाविकास आघाडी सरकार हे ट्रीपल सीट सरकार आहे. आता कोणी कौतुक केलं तरी भीती वाटते. तसेच आम्हाला थप्पड मारण्याची भाषा कोणी करु नये. आम्ही अशी थप्पड मारू की, कोणी उठणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे

.सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. तसेच आयुष्यात काही क्षण अनपेक्षितपणे येत असतात. मुख्यमंत्रिपद माझ्या स्वप्नातही नव्हते. या परिसरात मी लहानपणापासून यायचो. या जागेचं भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना होईल, असं वाटलं देखील नव्हतं.