पॅार्नोग्राफी प्रकरणात एकता कपूर, राज कुंद्राचं नाव घेण्यास मुंबई पोलिसाचा दबाव. अभिनेत्री गेहना वशिष्ठ


मुंबई : राज कुंद्रा पॅार्नोग्राफी केसमध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत. तसेच या केसमध्ये ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ देखील अडकली आहे. पोलीस गहनावर राज कुंद्रा पॅार्नोग्राफी केसमध्ये एकता कपूर आणि राज कुंद्राचं नाव घेण्यास दबाव टाकत असल्याचा आरोप गहनाने केला आहे. मात्र आपण असं करणार नसल्याचं तिने स्पष्ट मुंबई पोलिसाना सांगितले आहे
फेब्रूवारीमध्ये जेव्हा मला अटक करण्यात आली तेव्हा आपल्याला सोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपल्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केली असल्याचं गहनाने सांगितलं आहे अशातच आता गहनाने मुंबई पोलिसांवर खळबळजनक आरोप केले आहेत. एवढंच नाही तर आपल्याला देखील मुंबई पोलिसांनीच अडकवलं असल्याचं तिचं म्हणंण आहे
मुंबई पोलीस आपल्याला नको त्या आरोपामध्ये अडकवत आहेत असा आरोप गहनाने केला आहे. एवढंच नाही तर राजने देखील चुकीचं असं काहीही केलं नसून पोलीस उगाचच कोणत्याही आरोपाखाली आम्हाला अडकवत असल्याचं गहनाने म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज लंडनमधी केनरिन कंपनीसाठी पाॅर्न पटांची निर्मीती करतो. तसेच या कंपनीचे हाॅटशाॅट नावाचे एक अॅप देखील भारतात चालवण्यात येत होतं.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या या अॅपला इतर ओटीटी प्लॅटफाॅर्मसारखं सब्सक्रीबशन नसून एका चित्रपटासाठी किंवा सिरीजसाठी पैसे द्यावे लागतात. यातूनच राजने केवळ लाॅकडाऊनमध्ये तब्बल 500 कोटी रुपये कमावले आहेत.