पुण्याचा पॉझिटिव्हीटी 5 टक्क्यांच्या खाली आहे,तरी शिथीलता का नाही? महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : . “पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 5 टक्क्यांच्या खाली आहे, त्यामुळे शहर लेव्हल 2 मध्ये आहे, तरी शिथीलता दिली जात नाही. राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे शहरातील लसीकरण गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे”, असंही मुरलीधीर मोहोळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शिथीलता देण्याबाबत जे विधान केलं आहे, त्यासंदर्भात लवकर आदेश काढावेत, अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.
गेल्या 15 दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करतोय, मात्र त्यावर निर्णय का नाही माहीत नाही, अशी खंत मोहोळ यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगलीमध्ये बोलताना, जिथे रुग्णसंख्या कमी आहे, तिथे दुकाने रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येईल असं म्हटलं होतं
. “राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीत म्हणाले.
मुंबईतील लोकल तूर्तास सुरू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यांनी मुंबई लोकल इतक्यात सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उलट मुख्यमंत्र्यांनी सर्व कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरूच ठेवण्याचा सल्ला दिला आहे
. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसापूर्वी केली. यानुसार 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्यात आले. मात्र, निवडक 11 जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता तेथील निर्बंध काय असणार आहेत. गरज पडल्यास कोरोना नियंत्रणासाठी या ठिकाणी निर्बंध वाढवलेही जातील, असं टोपे यांनी सांगितलं.