अमरावतीमधील पोलीस कर्मचाऱ्याला सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करणं महागात

अमरावती : डायलॉगबाजी झाल्यानंतर हा कर्मचारी मोटरसायकलवरुन उठून पुढे चालू लागतो आणि व्हिडीओ संपतो. हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस खात्याने या व्हिडीओची दखल घेतली ड्युटीवर असतानाच शासकीय गणवेश आणि शस्त्राचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

हा व्हिडीओ अमरावतीमधील चांदूरबाजार येथील पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये सध्या तरी या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे

व्यक्ती ही पोलीस खात्यात कामाला असल्याचं स्पष्ट झालं असून पोलीस खात्याने यासंदर्भात कठोर कारवाई केली आहे.

सोशल नेटवर्किंगवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे व्हिडीओ शूट करुन पोस्ट करत असतात. मात्र अमरावतीमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला अशाप्रकारे व्हिडीओ शूट करुन सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करणं फारच महागात पडलं आहे.

या व्हिडीओ प्रकरण पोलीस खात्याने कठोर कारवाई करत या कर्मचाऱ्याचं निलंबन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस गणवेशामध्ये हातात पिस्तूल घेऊन या कर्मचाऱ्याने एका व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत हा पोलीस कर्मचारी एक डायलॉग मारतो आणि नंतर पिस्तूल दाखवताना दिसत आहे.

.

Latest News