नीरजने चोप्रा नें पदक दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित


जपान : शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेली भारताच्या अॅथलेटिक्समधील सुवर्ण पदकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपली. नीरज चोप्रा याने भालाफेकीत सुवर्ण फेक करत भारताला अॅथलेटिक्स फील्ड अॅण्ड ट्रॅक प्रकारात पहिलेवहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं.नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्ण पदकासाठी भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांची इच्छा पूर्ण केली.
नीरजने हे पदक दिवंगत दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केलं आहे. मी हे पदक मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. ते जिथे कुठे असतील त्यांनी मला खेळताना नक्की पाहिलं असेल, अशी मी आशा करतो, असं नीरज म्हणाला
नीरजची कामगिरी मिल्खा सिंग यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरली. 18 जून 2021 रोजी मिल्खा यांचे कोरोनामुळे निधन झालं होतं. नीरजच्या आधी ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांची कामगिरी भारताकडून सर्वोत्तम ठरली होती.पहिल्याच प्रयत्नात 87.03 आणि नंतर दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटरची भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं. नीरज चोप्रा हा सुरुवातीपासूनच भालाफेकीत पदकाचा दावेदार मानला जात होता