पुण्यात दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहणार : उपमुख्यमंत्री अजीत पवार

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून गेल्या आठवड्यापासून अपवाद वगळता कोरोना बाधितांचा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. 25 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण देखील पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी, व्यावसायिक, मॉलचालकांकडून निर्बंध शिथिल करण्याची मागणी करण्यात आली होती .पुण्यातील निर्बंधासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक पार पडल्याचं समजतंय. या बैठकीत पुण्यातील दुकाने संध्याकाळी 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

राज्याचे उपमुख्यमंत्री (Cm deputy) आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar)उपस्थितीत पुण्यात बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत पुण्यातील (Pune Corona) कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातील निर्बंध (Restrictions) शिथिल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे

. राज्य सरकारनं राज्यातील 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता दिली. मात्र, पुण्यात लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यानंतर पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गानी नाराजी व्यक्त केली

. पुण्यातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असतानाही व्यापाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून आपली दुकाने संध्याकाळपर्यंत सुरु ठेवली. या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.आज अजित पवार पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली

. त्यानुसार पुण्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत उघडी राहू शकतात. जर पुण्यातील निर्बंध शिथील केल्यास सोमवारपासून पुणेकरांसाठी निर्बंधाची नवी नियमावली लागू होईल.

Latest News