15 ऑगस्टपासून लोकल सुरू करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : जोपर्यंत लशीचा साठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आपल्याला सावध भूमिका घ्यावी लागली .त्यांनी मुंबईकरांना चांगली बातमी दिली आहे. 15 ऑगस्टपासून मुंबईत लोकल सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला मात्र लोकल सुरू करण्याची घोषणा केली असली तरी त्यामागे अनेक नियमावली असून त्याचे पालन केल्यास नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे अनेकांनी यावर निराशा व्यक्त केली आहे.

लोकल बंद असल्यामुळे मध्यवर्गीयांना कार्यालयात जाणे-येणे कठीण जात आहे. त्यामुळे लोकल सुरू करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता लोकलसाठी काही नियम व अटी लावल्या आहेत

. कोरोनाची लाट अजून काही गेली नाही. मागील वर्षी गणेशोत्सव, दिवाळी आणि नवरात्र कोरोनाच्या लाटेत साजरे करावे  लागले. त्यानंतर दोन लाटा आल्या होत्या. लशीचा साठा हळूहळू वाढत आहे.

  • लशीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील तरच लोकलने प्रवास करता येणार
  • यासाठी मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवासी रेल्वेचा पास डाऊनलोड करावा लागेल.
  • ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही ते शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.4 लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.