पुण्यातील अविनाश भोसले ची 4 कोटीच्या जमीनीवर ईडीकडून जप्त

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मालकीच्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड (ABIL) या कंपनीच्या चार कोटी मालकीच्या जमिनीवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

ज्या जमिनीची जप्ती करण्यात आली आहे. त्या जमिनीवर अविनाश भोसले यांच्या कंपनीचं कॉर्पोरेट कार्यालय आहे.ईडीकडून फेब्रुवारी महिन्यामध्ये पुण्यातील कार्यालयात आणि निवासस्थानी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारी दरम्यान भोसलेंचा मुलगा अमित याचीसुद्धा चौकशी करण्यात आली होती., ईडीकडून अविनाश भोसले यांच्या पुणे, मुंबई आणि दुबई मधील संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

अविनाश भोसले हे प्रसिद्ध व्यावसायिक आणि महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय व्यक्तीसोबत जवळीक असलेले व्यक्ती आहेत. अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत अविनाश भोसले यांनी ईडीच्या कारवाई विरूद्ध न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती समजत आहे…

Latest News