घरफोडीच्या गुन्ह्यात सात वर्षापासुन फरार असलेला सराईत गुन्हेगार गणेश कांबळे ला क्राईम ब्रँच च्या युनिट एक कडुन जेरबंद

घरफोडीच्या गुन्ह्यात सात वर्षापासुन फरार असलेला सराईत गुन्हेगार गणेश कांबळे ला क्राईम ब्रँच च्या युनिट एक कडुन जेरबंद
पुणे ( प्रतिनिधी ) कोथरूड पोलीस स्टेशनंच्या हद्दीत गेल्या सात वर्षांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी गणेश कांबळे याला क्राईम ब्रँच च्या युनिट एक कडून जेरबंद करण्यात यश आले आहे
गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी युनिट-१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमी मिळाली की घरफोडीच्या गुन्हयांत ७ वर्षापासुन फरार असलेला आरोपी गणेश कांबळे हा व्हि.आय.टी. हॉस्टेल चौकात भावाला भेटण्यासाठी रिक्षाने येणार आहे.
बातमी ची पडताळणी केल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने युनिट-१, गुन्हे शाखा पुणे शहर पथकाकडील स्टाफसह सदरठिकाणी सापळा लावला आरोपीस व्हि.आय. टी. हॉस्टेल चौकात रिक्षातून उतरत असतानाच त्यास ताब्यात घेतले
त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव गणेश भाऊराव कांबळे वय ३१ वर्षे रा.डॉल्फीन चौक, चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर, पुणे सध्या राहणार अण्णा भाऊ साठेनगर मु.पो. रोही-भालगाव ता.बार्शी जि. सोलापुर. असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे घरफोडीच्या गुन्ह्यांची चौकशी केली असता कोथरुड पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबुल दिली आहे
हे गावी गेले असता अज्ञात इसमाने कुलुप तोहुन घरफोडी केली होती. त्यामध्ये ६६,०००/- रु किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. त्याबाबत कोथरुड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक- ४७३/२०१४ भादवि कलम ४५७.३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.आरोपीस पुढील कारवाई साठी कोथरुड पोलीस स्टेशन,च्या ताब्यात देण्यात आले
नितीन लक्ष्मण तांबारे रा. डहाणूकर कॉलनी, कोथरुड पुणे या आरोपीस दाखल गुन्हयांत अटक करण्यात आली होती तर त्याचा साथीदार गणेश भाऊराव कांबळे रा – डॉल्फीन चौक चैत्रबन वसाहत बिबवेवाडी पुणे हा आरोपी सदर गुन्ह्यात गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे ०७ वर्षापासुन फरार होता.
आरोपीकडे सखोल तपास केला असता तो सुमारे सात वर्षापासुन सदर गुन्हयामध्ये फरार आहे फरार झाल्यानंतर त्याने लग्न केले व तो आपले कुंटुबासह अण्णा भाऊ साठेनगर मु.पो. रोही भालगाव ता. बार्शी जि. सोलापुर येथे राहत होता.
. आरोपी विरुध्द यापूर्वीचे भारती विदयापीठ २ बिबवेवाडी १ सहकारनगर १ कोथरुड १ लोणी काळभोर १ व हवेली पोलीस स्टेशन४ असे घरफोडी चोरी, दरोड्याची तयारी व इतर चोरी चे एकुण दहा गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदशनाखाली युनिट १, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, सतीश भालेकर, .तुषार माळवदकर यांनी केली आहे.