उमेदवाराची निवड होताच 48 तासात गुन्हेगारी तपशिल प्रसिध्द करणे बंधनकारक – सर्वोच्च न्यायालय


नवीदिल्ली : गुन्हेगारी ही सुसंस्कृत राजकारणाला बदनाम करते व लोकशाहीच्या मुल्यांना पायदळी तुडवत राजकारणात आपले पाय भक्कम करत असल्याचं पाहुन सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय फार महत्वपुर्ण आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाराची निवड होताच अवघ्या 48 तासात उमेदवाराचा गुन्हेगारी तपशिल हा प्रसिध्द करणे बंधनकारक असेल असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत
राजकारण आणि गुन्हेगारी हे एकमेकांचे मित्रच बनल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. अलिकडच्या काळात राजकीय गुन्हेगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्या लक्षत येतच असेल. या व्यवस्थेत सरकारी कर्मचारी व्हायचे असेल तर तुम्ही कसल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नसला पाहीजे पण सरकार व्हायचं असेल तर गुन्हा काय केलाय हे सुद्धा आता पाहीलं जात नाही.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर एफ नरिमन आणि बी आर गवई यांच्या खंडपीठाने यासंबंधी 13 फेब्रुवारी 2020 मध्ये देण्यात आलेल्या आदेशात बदल केले आहेत
. गतवर्षी फेब्रुवारी मध्ये दीलेल्या निर्णयात अस म्हटलं होतं कि, उमेदवाराची निवड झाली की 48 तासांच्या आत किंवा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन आठवडे आधी ही माहिती भरणे गरजेचे आहे,
गुन्हेगारांना राजकीय बंदी घालण्यासाठी राज्य विधीमंडळे काहीच का करत नाही, असा खडा सवाल पण न्यायालयाने राज्यांना विचारला होता. त्यावर आता थेट न्यायालयानेच निर्णय घेऊन गुन्हेगारी निर्मुलनासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. राजकिय गुन्हेगारी विरोधात आलेल्या एका याचिकेवर न्यायालयाने हा महत्वपुर्ण निर्णय दिला आहे.