स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना न्याय मिळणार का? 15 टक्के पदोन्नती चा कोटा ठरत आहे अडसर….

पिंपरी ( विनय लोंढे ) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सेवाप्रवेश व सेवा सेवांचे वर्गीकरण नियम 2016 रोजी बनवण्यात आला त्यामध्ये अंतर्गत सेवा भरती साठी अनुसरावयाची कार्यपद्धती बनविण्यात आली त्यामुळे तांत्रिक संवर्गातील पदोन्नती गट क तांत्रिक सेवा कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नती साठी पंधरा टक्के हा नियम बनवण्यात आला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना कधी न्याय मिळणार….. 15 टक्के पदोन्नती नियमाची अट ठरत आहे अडसर….यामुळे प्रशासनाला आणी अभियांत्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे
नागपूर महानगरपालिका तसेच नवी मुंबई महानगरपालिका या सर्व महानगरपालिकेमध्ये सेवाप्रवेश नियम व सेवांचे वर्गीकरण बनवताना हा पदोन्नतीचा कोटा 50 टक्के करण्यात आला आहे…. परंतु पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत हा कोटा फक्त 15 टक्के आहे. याबद्दल विचारणा केली असता मनपाकडे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही
राज्य शासनाकडे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ते कनिष्ठ अभियंता पद्धतीसाठी 25 % महानगरपालिकेत मात्र 50% कोटा कसा असा प्रश्न निर्माण होत आहे
पालिकेचा सेवाप्रवेश नियम 2019 मध्ये अंतिम करण्यात आला त्यामध्ये 15 टक्के पदोन्नती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना कनिष्ठ अभियंता पदोन्नती देण्यासाठी 15 टक्के चा नियम निश्चित करण्यात आला…. परंतु राज्य शासनामध्ये पदोन्नतीचा कोटा सर्व ठिकाणी 25 टक्के आहे…. परंतु आपल्या महानगरपालिकेत हा 15% कसा? त्यामुळे पालिकेच्या आभियंत्यावर अन्याया होत असल्याची भावना निर्माण होत असल्याची खंत बोलून दाखवतात
पालिकेला अनुभवी व उच्चशिक्षित अभियंत्यांची गरज असताना पदोन्नतीचा कोटा 15 % कसा इतर महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये 50% असताना आपल्या महानगरपालिकेत १५% कसा …… अन्यायकारक नियमामुळेच कनिष्ठ अभियंता पदाची पदोन्नतीचे कामकाज रोखले आहे…त्यामुळे हलगर्जी पणा करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यावर कारवाई आयुक्त राजेश पाटिल करणार का? अशी मागणी आभियंत्यांकडून करण्यात येत आहे
. त्यामुळे पालिकेला मिळणारे अनुभवी अभियंते व कार्यक्षम कार्यप्रणाली यामुळे पालिकेचे नुकसान होत आहे
राज्य शासनाकडे पाठपुरावा करून पदोन्नतीचा कोटा हा तांत्रिक संवर्गातील 50 टक्के करून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ते कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नती मधील अनेक अडचणी दूर होतील तसेच पालिका सेवेतील अनुभवी व उच्चशिक्षित अभियंत्यांचा मनपास फायदा होईल
मनपा मध्ये काम करण्याचा अनुभव व उच्च शिक्षणामुळे कामकाज कार्यक्षम व अधिक गतिमान होईल राज्य शासनाकडे पाठपुरावा करून इतर महानगरपालिके सारखा पदोन्नतीचा 50% कोटा करून उच्चशिक्षित अनुभवी अभियंत्यांना न्याय द्यावा…. यातून महापालिकेला फायदा होईल
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी नवीन अभियंत्यांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवून नवीन अभियंत्याची नियुक्ती करावी… पदोन्नतीचे अभियंत्यांच कार्यक्षम व गतिमान पद्धतीचे कामकाज होऊन मनपास त्याचा फायदा होईल….