लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी ट्वीटर भाजप सरकारला साथ – प्रियांका गांधीं


नवीदिल्ली : काँग्रेस नेत्याचे अकाउंट बंद करून ट्वीटर आपल्या धोरणाचं पालन करतंय की मोदी सरकारच्या? अनुसूचित जाती आयोगाचे अकाउंट का बंद केले नाही. आयोगानेही तेच फोटो ट्वीट केले होते. जे आमच्या एका नेत्याने केली होती, असं प्रियांका ट्वटमध्ये म्हणाल्या.मोठ्या प्रमाणावर काँग्रेस नेत्यांचे अकाउंट बंद करून ट्वीटर भारतातील लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी ट्वीटर भाजप सरकारला साथ देत आहे, असा आरोप प्रियांका गांधींनी केला.
ट्वीटरने गुरुवारी राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे ट्वीटर अकाउंट बंद (लॉक) केले. यावरून काँग्रेस सरचिटणीसयांनी ट्वीटरवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी मुलीच्या पीडित आई-वडिलांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो राहुल गांधींच्या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आले होते.