भारत फ्लॅग फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनी ‘सुराज्य प्रतिज्ञा ‘ उपक्रम झेंडे पायदळी न जाऊ देण्यासाठी कलेक्शन बॉक्सेसचे मोफत वितरण

भारत फ्लॅग फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनी ‘सुराज्य प्रतिज्ञा ‘ उपक्रम झेंडे पायदळी न जाऊ देण्यासाठी कलेक्शन बॉक्सेसचे मोफत वितरण
पुणे :भारत फ्लॅग फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनी ‘सुराज्य प्रतिज्ञा ‘ वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला .१५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान हा उपक्रम चालणार असून प्रतिज्ञा वाचन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.तिरंगी ध्वजाला वंदन करून ही प्रतिज्ञा वाचन करावे असे आवाहन फौंडेशनचे संस्थापक गिरीश मुरुडकर,कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांनी केले होते.
मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा तयार करण्यात आली असून प्रतिज्ञा वाचन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. या सुराज्य प्रतिज्ञेचे लेखन गिरीश मुरुडकर यांनीच केले आहे.तसेच झेंडे पायदळी न जाऊ देण्याचा उपक्रम यंदाही सुरू आहे.ध्वज माहितीची आणि झेंडे कलेक्शन बॉक्सेसचे मोफत वितरण मुरूडकर झेंडेवाले,इलेक्ट्रिक मार्केट,मोती चौक इथे चालू आहे, असे मुरुडकर यांनी सांगीतले
. शाळा सुरू झाल्यावर ही सुराज्य प्रतिज्ञा सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी भारत फ्लॅग फाउंडेशन चे प्रतिनिधी विनामूल्य तासिका घेऊ शकतील.शाळा कॉलेजेस संस्थांनी 9822013292 ,9850001753 या नंबर्स वर संपर्क करावा,असे आवाहन फौंडेशनने केले आहे
.भारत फ्लॅग फाउंडेशनचे हे 21 वे वर्ष असून झेंडे पायदळी न जाऊ देण्याचा उपक्रम यंदाही सुरू आहे.ध्वज माहितीची आणि झेंडे कलेक्शन बॉक्सेसचे मोफत वितरण मुरूडकर झेंडेवाले,इलेक्ट्रिक मार्केट,मोती चौक इथे चालू आहे, असे मुरुडकर यांनी संगितले