शिवणे गावात पाठलाग करुन तरुणावर गोळीबार करणाऱ्यास अटक…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 12 ऑगस्ट रोजी युनिट 6 कडील पोलीस पथक हद्दीमध्ये गस्त करीत असताना पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांना खबर मिळाली की,काही दिवसापुर्वी उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवणे गावामध्ये गोळीबार करून फरारी झालेला सराईत गुन्हेगार निलेश गायकवाड याच्या टोळीतील कार्तिक इंगवले हा नाशिक फाटा येथे येणार आहे. त्यानूसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याचाकडे तपास केला असता, त्याने पुर्वी भांडणाच्या कारणावरुन दि.8 ऑगस्ट रोजी शिवणे येथे त्याच्या साथीदारसह केदार भालशंकर याच्यावार गोळीबार केला असल्याचे सांगितलेआरोपीस पुढील तपासकामी उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्‍ट अंतर्गत गुन्हाही दाखल आहे.

शिवणे गावात चारचाकी गाडीचा पाठलाग करुन तरुणावर गोळीबार करणाऱ्यास अटक करण्यात आली . ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने केली आहे.कार्तिक संजय इंगवले ( 18 , रा. रामनगर, वारजे माळवाडी ) असे अटक आरोपीचे नाव आहे.ही कारवाई उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षकनरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.

Latest News