समर्थ पोलिसांनी सापळा लावून दुचाकीवर असलेल्या चोरट्याला पकडले….

सुलतान रिजवान शेख (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.
समर्थ पोलीस ठाण्याचे तपास पथक स्वातंत्र्य दिनानिमित्त गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना नाना पेठेतील आझाद आळीमध्ये चोरटा मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची बातमी मिळाली.त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दुचाकीवर असलेल्या चोरट्याला पकडले. मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याच्या खबरीवरुन पकडलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 2 वाहन चोरी व 4 मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात समर्थ पोलिसांनी यश आले आहे.
त्याच्याकडील मोबाईलबाबत चौकशी केल्यावर त्याने तो नाना पेठेतून चोरल्याचे सांगितले.
त्याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने दीड महिन्यापूर्वी गणेश पेठ येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच दोन दिवसांपूर्वी सासवड येथून आणखी एक दुचाकी चोरली असल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून दोन दुचाकी व 4 मोबाईल असा माल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीकडील 3 मोबाईलच्या मालकांचा शोध सुरु आहे.
ही कामगिरी परिमंडळ- 1 च्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे (DCP Dr. Priyanka Narnaware), सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Sr. PI. Vishnu Tamhane), पोलीस निरीक्षक उल्हास कदम (Police Inspector Ulhas Kadam) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश भालेराव, पोलीस अंमलदार जितेंद्र पवार, धिरज शिंदे, सुमित खुट्टे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांनी केली आहे.