खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक हडपसर पोलिसांची कारवाई

पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणावर दोघा भावांवर तलवारीने व फरशीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.याबाबत समीर भिमाशंकर नरळे (वय २२, रा. मंगेश तुपे चाळ, कावळेवस्ती) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
आकाश रवी सरोदे (वय २२) सुदर्शन रामु जाधव (वय १९, रा. सुखकर्ता कॉलनी, फुरसुंगी) आणि अमोल ऊर्फ सागर मल्हारी भिसे (वय २०, रा़ फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ४ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरळे व त्यांच्या मित्रांची आरोपींबरोबर दुपारी भांडणं झाली होती. त्यानंतर नरळे त्यांचे मित्र विशाल गायकवाड व त्यांचा भाऊ गणेश हे शेवाळवाडी मार्केटमागील कॅनॉलचे रोडवरुन जात होते. यावेळी टोळक्याने त्यांना अडविले
. विशाल व गणेश यांच्यावर तलवारीने डोक्यावर, पाठीवर व हातावर वार करुन जबर जखमी केले. तसेच फरशीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला असून तिघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.