पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह चौघे अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळ्यात

पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह चौघे अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळ्यात

’पुणे – 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Corporation) पुण्याच्या लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti Corruption) मोठी कारवाई करण्यात आली असून स्टॅंडीग कमीटी चेअरमन – नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लांडगे यांच्यासह त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे

.पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode) आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP suhas nadgouda)यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे. मात्र, पुणे अ‍ॅन्टी करप्शनने 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) मोठी कारवाई केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 9 लाखाचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट मोठा मासा गळाला लागल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात (Pune) प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. अ‍ॅन्टी करप्शनचे पथक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले आहे. कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे

Latest News