अमेरिका सैनिकांनी 11 सप्टेंबर पर्यत तालिबाण सोडावा : तालीबन


अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबान्यांनी आता थेट अमेरिकेलाच इशारा दिला आहे. तालिबान्यांनी अमेरिकेला 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तान सोडण्याचा इशारा दिला आहे. तालिबानने जरी अफगाणिस्तानवर कब्जा केला असला तरी अद्याप 10 हजार अमेरिकी सैनिक अजूनही अफगाणिस्तान आहेत. याचदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवान म्हणाले की,
काबूल विमानतळावर झालेल्या चेंगराचेंगरी आणि गोळीबाराच्या घटनेत गेल्या काही दिवसात किमान 10 अफगाण नागरिकांचा बळी गेला आहे.
अमेरिकन सैन्याचे मेजर जनरल हँक टेलर यांनी सांगितलं आहे की, अमेरिकन सैन्य हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाची (एचकेआयए) सुरक्षा करत राहणार आहे. जेणेकरून येथून अमेरिकन आणि अफगाणांना सुरक्षित बाहेर काढता येईल.
अमेरिका तालिबानच्या संपर्कात आहे. त्यांना सांगण्यात आले आहे की नागरिकांना सुरक्षितपणे विमानतळावर नेण्यास ते तयार आहेत. याच्या एक दिवस आधी पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी म्हणाले होते की, अमेरिकन कमांडर्सनी अधिक तपशील न देता विमानतळाबाहेर तालिबानशी चर्चा केली होती, असे ते म्हणाले आहेत.
अफगाणिस्तानच्या परिस्थितीला जबाबदार धरत जनतेचा आणि खासदारांचा रोष सहन करावा लागत असलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सोमवारी म्हणाले आहेत की, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष मोहम्मद अशरफ घनी यांनी रविवारी देश सोडला, कारण तालिबानी सैन्याने देशाची राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले.