पिंपरीचिंचवडतील लसीकरण केंद्रात महिलेने चाकू हातात घेऊन धुमाकूळ…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी महिला आणि त्यांचे अन्य सहकारी मंगळवारी विठ्ठलनगर, नेहरूनगर येथे साई लीला हाऊसिंग सोसायटी समोर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम करत होत्या. त्यावेळी महिला हातात चाकू घेऊन आली. तिने लसीकरण केंद्रावर लावलेल्या सेल्फी पॉईंटचे नुकसान केले. त्यांनतर फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या अन्य सहकारी महिलांना खुर्ची व हाताने मारहाण केली. सर्व स्टाफला शिवीगाळ करून धमकी देऊन महिला निघून गेली. पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे तपास करीत आहेत.पिंपरीतील लसीकरण केंद्रात महिलेने चाकू हातात घेऊन राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच केंद्रातील सेल्फी पॉईंटचे नुकसान करून लसीकरण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना विठ्ठलनगर, नेहरूनगर येथे साई लीला हाऊसिंग सोसायटी समोर मंगळवारी घडली.मारहाण झालेल्या कर्मचारी महिलेने याप्रकरणी बुधवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार तोडफोड आणि मारहाण करणाऱ्या महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Latest News