ऑलिम्पिकमध्ये भालाफेक गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्राचं नाव पुण्यातील आर्मी स्टेडियमला


टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्राचं नाव आज पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आलं. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आर्मीतील ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आलाय. भारतीय सैन्याच्या पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मधील मैदानाला आज टोकिओ ऑलिम्पिक मधील सुवर्णपदक विजेता भालापटू निरज चोप्राचे नाव देण्यात येतंय
. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख मनोज नरवणे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मैदानाचा नामकरण सोहळा होतोय. नीरज चोप्रा बरोबरच भारतीय सैन्यातील 16 ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहेत आहे.
यावेळी नाईक सुभेदार दीपक पुनिया यांचा विशेष मेडल देऊन सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसंच नाईक अर्जुनलाल जाट, नाईक सुभेदार विष्णू सर्वनंद, महाराष्ट्रातील नाईक सुभेदार अविनाश सावळे यांनाही यावेळी सन्मान केला गेला. त्यावेळी आर्मीतील ऑलिम्पिक खेळाडूंची शॉल देऊन नीरज चोप्राने राजनाथ सिंह यांचं स्वागत केलं.