पिंपरी चिंचवड शहरातील कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया मोफत! जवाबदारी बजाज फौंडेशन ची,आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेचे वार्षिक वाचविले आठ कोटी

पिंपरी शहरातील कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया मोफत व शास्त्रीय पद्धतीने करण्याची जवाबदारी बजाज फौंडेशन ची,
पशु वैद्यकीय आधिकारी यांच्या लूटमारीला
आयुक्त राजेश पाटील यांनी लावला लगाम
पिंपरी (विनय लोंढे ) पिंपरी चिंचवड शहरातील पाळीव,मोकाट कुत्र्याच्या शत्रक्रियेसाठी पशु वैद्यकीय अधिकारी वर्षाला पालिकेच्या तिजोरीवर आठ कोटीला चा खर्च करून लूटमार करीत असल्याच्या तक्रारी पालिका आयुक्त राजेश पाटिल यांच्याकडे आल्या होत्या आयुक्तानी अभ्यास करून सामाजिक संस्था ची माहिती घेऊन बजाज फाऊंडेशन कडुन मोफत करण्यासाठी प्रस्ताव आल्याची माहिती मिळाल्या नंतर सर्व जवाबदारी त्याच्याकडे दिल्याने वार्षिक आठ कोटीच्या लूटमारीला लगाम घातला असल्याने शहरात आयुक्त राजेश पाटिल व सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांचे कौतुक होत आहे
पिंपरी चिंचवड शहरातील मोकाट कुत्र्यांची शस्त्रक्रिया(श्वान जन्म नियंत्रण ) करण्यासाठी वर्षाला लागणारे आठ कोटी रुपये वाचणार असून यापुढे शहरातील कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया मोफत व शास्त्रीय पद्धतीने केल्या जाणार असून यासाठी बजाज फौंडेशनचे मोफत करणार असल्याची माहिती पशुवैदकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरात मोकाट फिरणारे कुत्रे व इतर जनावरे याबाबत नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या सतत तक्रारी येत असतात.यावर उपाय म्हणून मोकाट कुत्र्यांची शस्त्रक्रिया करण्याचे कंत्राट दरवर्षी दिले जाते. यासाठी पिंपरी महापालिका दरवर्षी आठ कोटी रुपये खर्च करते मात्र समाधानकारक उपाय होत नसल्याने नागरिक व लोकप्रतिनिधी हतबल झाले होते.महापालिका सर्वसाधारण बैठकीतही अनेकवेळा आरोप प्रत्यारोप होत होते.
पिंपरी चिंचवड शहरातील मोकाट कुत्र्यांचे नियंत्रण व देखभाल मोफत करणेकमी बजाज फौंडेशन च्या वतीने पिंपरी महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागास मागील वर्षी प्रस्ताव दाखल केला होता मात्र पशु वैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांनी आर्थिक हितसंबधा खातर त्याकडे दुर्लक्ष केले .मोफत श्वान व देखभाल केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाकडे बजाज फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा चकरा मारल्या मात्र टक्केवारीत अडकलेल्या अधिकाऱ्यांनी बजाज फौंडेशचा प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ केली.
याबाबतची माहिती महापालिकेचे क्रियाशील आयुक्त राजेश पाटील यांना समजताच त्यांनी संबंधित प्रस्तावाची फाईल मागून घेतली व बजाज फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांचा प्रस्ताव पाहिला त्यांच्याकडून सवित्तर माहिती घेऊन त्याच्या त्याच्या प्रकल्पला भेट देण्याची जवाबदारी अति आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे दिली
त्यानंतर बजाज फौंडेशनच्या प्रस्तावास ताबडतोब मंजुरी दिली असून येत्या दोन महिण्यात त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे.
दोन प्रभागात एक श्वान नियंत्रण व देखभाल केंद्र!पिंपरी चिंचवड शहरातील वाढती पाळीव व मोकाट कुत्र्यांची संख्या पाहता अनेक श्वान जन्म नियंत्रण व उपचार केंद्राची गरज लक्षात घेऊन येत्या दोन महिन्यात दोन प्रभागात एक श्वान नियंत्रण व देखभाल केंद्र उभारण्याचे महापालिका आयुक्तांनी निश्चित केले आहे
बजाज फौंडेशनला इमारत व लागणारे पिंजरे उपलब्ध करुन दिल्यास बजाज फौंडेशन राज्य सरकारचे (AWBI) जीव जंतू कल्याण मंडळ यांच्या निकषानुसार दररोज मोकाट कुत्र्यांच्या मोफत 200 शस्त्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने पार पडणार असून शस्त्रक्रियेनंतर पुढील पाच दिवस कुत्र्यांना लागणारा खर्चही बजाज फौंडेशन करणार आहे.
दरवर्षी करोडो रुपये खर्च करून कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.बजाज फौंडेशनच्या या उपक्रमामुळे वर्षाचे आठ कोटी वाचणार असून कुत्र्यांच्या संख्येवर मर्यादा येतील
शहरातील नागरिक व महापालिका हिताचा निर्णय न घेता निव्वळ टक्केवारीसाठी बजाज फौंडेशन सारख्या नामवंत संस्थेला वेठीस धरून महापालिकेचे नुकसान करणाऱ्या पिंपरी महापालिकेच्या अरुण दगडे अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्याची गरज आहे.