अजीत दादा जनहिताचा निर्णय घेण्याची धमक फक्त तुमच्यातच प्राधिकरणाच्या जागेवर राहणाऱ्या संबंधिताच्या नावावरच 7/12 करा-भाजपा नगरसेवक रवि लांडगे


पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या अन्य भागात प्राधिकरणाच्या जागेवर घरे बांधून राहणाऱ्या संबंधित नागरिकांच्या नावावरच त्या जागेचा सातबारा करा,सरकारी शिक्का कायमचा पुसून जनहिताचा निर्णय घेण्याची धमक फक्त तुमच्यातच आहे अशी मागणी नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न समजावून घेत तो कायमचा मार्गी लावण्याबाबत लवकर धोरणात्मक निर्णय घेण्याची ग्वाही नगरसेवक लांडगे यांना दिली आहे
भाजपचे नगरसेवक लांडगे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची पुण्यात भेट घेत मागणीचे निवेदन दिले. या वेळी नगरसेवक अजित गव्हाणे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत उपस्थित होते. यासंदर्भात नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण नुकतेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीन झाले आहे.
त्यामुळे प्राधिकरण 50 वर्षांनंतर विसर्जित झाले. विलीनीकरणानंतर प्राधिकरणाच्या सर्व चल, अचल, मालमत्ता, दायित्वे, कार्यालये, व्यापारी इमारती, ठेवी आणि इतर गुंतवणूक पीएमआरडीएकडे हस्तांतरीत केली जाणार आहेत. तर प्राधिकरणाने विकसित करुन दिलेले भूखंड, आरक्षित व अतिक्रमण झालेल्या भूखडांची मालकी किंवा ताबा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे राहणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी औद्योगिक वसाहत आहे.