पुण्यातील पर्सिस्टंट कंपनीचे सर्वेसर्वा आंनद देशपांडे अब्जाधीशांच्या यादीत


पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम कंपनीचे सर्वेसर्वा आंनद देशपांडे यांचं नाव जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आलं आहे. पर्सिस्टंट सिस्टीम या कंपनीमधील संपत्तीचा वाटा हा एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असल्याचं फोर्ब्ज या मासिकाने म्हटलं आहे
फोर्ब्स उद्योगपतींच्या कार्यक्षेत्रातील योगदान, महत्व त्यांचा रोजगार निर्मितीवर झालेला सामाजिक परिणाम यांचा विचार करून जगभरातील उद्योगपतींची यादी जाहीर करते. ही यादी दरवर्षी फोर्ब्ज मासिकातर्फे प्रकाशित केली जाते. अशातच या यादीत महाराष्ट्रातील एका उद्योगपतींचा समावेश करण्यात आला आहे
. डेटा मॅनेजमेंट, डिजिट्सल इंजिनीअरींग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करणारी देशपांडे यांची कंपनी आहे. पर्सिस्टंट या कंपनीचं वार्षिक उत्पन्न 56.05 कोटी डॉलर इतकं असल्याचं फोर्ब्सने सांगितलं आहे. त्याचबरोबर पर्सिस्टंट कंपनीमध्ये 14 हजारांहून अधिक कर्मचारी काम करत असून जगभरातील 45 देशांमधील कर्मचारी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीचा भाग आहेत.
दरम्यान, मराठी उद्योजक कमी आहेत अशी टीका वारंवार केली जात आहे. त्यामुळे तरूण मुलांना व्यवसाय संबंधित प्रशिक्षण देण्याच्या प्रयत्नातून देशपांडे यांनी सहा वर्षापूर्वी ‘दे आसरा’ या फाउंडेशनची स्थापना केली आहे. तसेच पुणे पोलिसांसाठी देशपांडेंनी 450 सदनिका असलेला प्रकल्प देखील स्वत:च्या पैशातून बांधला आहे.