तालिबानला पाकिस्तानची ISI चालवत आहे – अमरुल्ला सालेह

taliban

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती आणि रेजिस्टेंस दलाचे प्रमुख अमरुल्ला सालेह यांनी पाकिस्तानबद्दल मोठा दावा केला आहे. ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलच्या लेखात सालेह म्हणाले की, तालिबानला पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था ISI चालवत आहे

तालिबान प्रवक्त्याला पाकिस्तानी दूतावासाकडून दर तासाला सूचना मिळत आहेत. पंजशीरमध्ये तालिबान आणि रेजिस्टेंस फोर्स यांच्यातील लढाई सुरूच आहे. दरम्यान, रेजिस्टेंस दलाने दावा केला आहे की, त्यांनी 600 तालिबान मारले आणि 1000 तालिबान एकतर आत्मसमर्पण केले किंवा शनिवारी पकडले गेले. अल जझीराच्या एका अहवालात म्हटले आहे की तालिबानने सांगितले की, ते पंजशीरची राजधानी बझारक आणि प्रांतीय गव्हर्नर कंपाऊंडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लँडमाईन्समुळे पुढे जाऊ शकले नाहीत.

सालेहने असेही लिहिले आहे की, पंजशीरमध्ये तालिबानचा सामना करण्याचा निर्णय घेताना, त्याने आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, जर मी तालिबानशी लढताना जखमी झालो तर मला डोक्यात दोनदा गोळी घाला, मला तालिबानला शरण जायचे नाही.


अफगाणिस्तानमध्ये सत्तेसाठी तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात लढाई सुरू झाली आहे. अफगाणिस्तानच्या ‘पंजशीर ऑब्झर्व्हर’ या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, तालिबानचे सहसंस्थापक मुल्ला बरादर हक्कानी नेटवर्कच्या गोळीबारात जखमी झाले आहेत. बरदारवर सध्या पाकिस्तानात उपचार सुरू असल्याचेही अहवालात म्हटले आहे. मात्र याची पुष्टी झालेली नाही

. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैनिक पंजशीरमध्ये सुरू असलेल्या युद्धात तालिबानला पाठिंबा देत आहेत. असे सांगितले जात आहे की, पंजशीरमध्ये मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकाचे आय-कार्डही सापडले आहे. पाकिस्तानवर तालिबानला मदत आणि प्रोत्साहन दिल्याचा आरोप बऱ्याच काळापासून केला जात आहे आणि अफगाणिस्तानवर तालिबानच्या राजवटीमागे पाकिस्तानचा हात असल्याचेही सांगितले जात आहे.

Latest News