अफगाणिस्तानात सरकार स्थापनेची घोषणा


तालिबानसोबत झालेल्या शांतता करारानुसार अमेरिकेने आता अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागं घेतलं आहे. मात्र तालिबानने शांतता करार मोडत अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवलं. त्यानंतर आता तालिबानने अफगाणिस्तानात आपलं नव्या सरकारची घोषणा केली आहे. तर त्यांच्या नव्या मंत्रीमंडळाची देखील माहिती समोर येत आहे.
मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हे अफगाणिस्तानमधील तालिबानचे नवे पंतप्रधान असणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरला या नव्या सरकार स्थापनेची औपचारिक घोषणा होऊ शकते. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या मुल्ला बरादर यांना उपपंतप्रधान पद देण्यात येणार आहे. तर सिराजुद्दीन हक्कानी यांना कार्यकारी गृहमंत्री पद देणार आहेत.
मुल्ला याबूक यांना संरक्षणमंत्री तर, अमिर मुत्तकी यांना परराष्ट्रमंत्री केलं जाईल. खैरउल्लाह खैरव्वा यांच्याकडे माहिती मंत्रालय देण्यात येणार आहे. अब्दुल हकिम यांच्याकडे न्यायमंत्री पदाची दबाबदारी देण्यात आली आहे. तर शेर अब्बास यांना उपपरराष्ट्रमंत्री करण्यात आलं आहे.
दरम्यान, जागतिक स्तरावर प्रसारमाध्यमांना अफगाणिस्तानमधील माहिती पोहचवण्यासाठी जबीउल्लाह मुजाउद्दीन हा नेता अधिकृत प्रवक्ता म्हणून काम पाहणार आहे.संध्याकाळी अफगाणिस्तानात सरकार स्थापनेची घोषणा केली. अफगाणिस्तानातील नव्या सरकारचे प्रमुख मुल्ला हसन अखुंद हे असतील, अशी तालिबानच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली.अखुंद यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये मुल्ला याकूब संरक्षणमंत्री, तर सिराज हक्कानी गृहमंत्री असतील.तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितलं की, “ही एक तात्पुरती व्यवस्था आहे. पुढे पूर्ण सरकार स्थापन करण्याच्या योजनेवर काम केलं जाईल. ” बीबीसी प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांनी तालिबानच्या नेत्यांच्या हवाल्यानं सांगितलं की, मुल्ला बरादर हे अफगाणिस्तानातील नव्या सरकारचे उपप्रमुख असतील.
- प्रमुख – मुल्ला मोहम्मद हसन अखुंद
- उपप्रमुख – मुल्ला अब्दुल घनी बरादर आणि मुल्ला अब्दुल सलम हनाफी
- गृहमंत्री – सिराजुद्दीन हक्कानी
- संरक्षणमंत्री – मुल्ला याकूब
- परराष्ट्र मंत्री – आमिर खान मुत्ताकी
“सध्या शूरा परिषद (मंत्रिमंडळ) कामकाज पाहील आणि मग पुढे ठरवलं जाईल की, लोक या सरकारमध्ये कसा सहभाग घेतात,” असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलं
अफगाणिस्तानमधील नवीन मंत्रिमंडळ सर्वसमावेशक असेल, असा दावा तालिबाननं केला होता.
तालिबानच्या नेत्याला बीबीसीनं प्रश्न विचारला की, मंत्रिमंडळात एकही महिला का नाहीय? तर त्यांनी उत्तरादाखल सांगितलं की, संपूर्ण मंत्रिमंडळाची अद्याप घोषणा झाली नाहीय.