पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त राजेंश पाटिल यांच्या कार्यलयात सत्ताधारी भाजपा नगरसेवक आशा शेडगे यांच्याकडून शाहिफेक आंदोलन

पिंपरी : सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी आज ( गुरुवारी ) आंदोलन करत आयुक्त राजेश पाटील यांच्या नामफलकावर शाई फेकली. यावेळी मोठय़ा प्रमाणात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला काळिमा फासली आहे, आंदोलन हे लोकशाही पद्धतीने केले पाहिजे म्हणत नगरसेवक शेडगे च्या विरोधात भूमिका घेत सत्ताधारी भाजपचे नेते नामदेव ढाके यांनी घटनेची निदा केली आहे .
शाई फेकल्याने पोलिसांनी नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अशी महापालिका म्हणून नावारूपाला आलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आता ग्रहण लागण्याचे चिन्ह आहेत. कासारवाडी-दापोडी प्रभागाचे प्रतिनिधीत्व आशा शेंडगे करतात . कासारवाडीत भूमिगत गटारांची कामे सुरु आहेत. त्यासाठी रस्ते खोदाई केली आहे. आता पुन्हा स्मार्ट सिटीसाठी खोदाई केली जाणार आहे .
उद्यापासून गणेशोत्सव सुरु होत आहे. गौराई आहे. त्यामुळे खोदाई करु नये. गणेशोत्सवानंतर खोदाई करावी.जेणेकरुन गणेशोत्सवात नागरिकांना रहदारीला अडथळा होणार नाही. याबाबत त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली होती. स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदाई केली जात आहे. याबाबत स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांना विचारले असता हे काम सुरु होईलच असे त्यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या नगरसेविका शेंडगे यांनी महिलांसह महापालिका भवन गाठले. पहिल्या मजल्यावरील भालकर यांच्या दालनात गेल्या. मात्र ,भालकर उपस्थित नसल्याने चौथ्या मजल्यावरील आयुक्त दालनात पोहोचल्या
. महिलांनी ठिय्या मांडला. घोषणाबाजी सुरू केली. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या महापालिका मुख्यालयातील दालनावरील नामफलकावर शाई फेकून प्रशासनाचा निषेध केला. शाई फेकल्यामुळे पोलिसांनी नगरसेविका शेंडगे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले