पिंपरी चिंचवडमध्ये विवाहित महिलेनं प्रियकराशी झालेल्या वादानंतर आत्महत्या

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देहूरोड परिसरात विवाहित महिलेनं प्रियकराशी झालेल्या वादानंतर फॅनला ओढणीच्या साहाय्याने केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध आत्महेस प्रवृत्त केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे.

आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी नेमकं प्रकरण काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी पोलिसांनी सोसायटीतील इतर रहिवाशांकडे विचारपूस केली. तेव्हा पोलिसांना घटनेमागील नेमकं कारण का ते लक्षात आलं. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रसाद गायकवाड आणि रितेश भालेराव या दोघांना अटक केली. तसेच तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे मृतक महिलेला पाच-सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतक 26 वर्षीय महिला आणि आरोपी प्रसाद गायकवाड यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यामध्ये अनेकदा प्रियकर प्रसाद आणि मयत महिला याच्यांमध्ये वाद व्हायचे. त्यात आरोपी प्रसाद गायकवाड हा तिला शिवीगाळ करत मारहाण देखील करत होता. त्यामुळे महिलेने राहत्या घरात बेडरुममधील छताच्या फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली

.

Latest News