मोघम तक्रारी करत स्मार्ट सिटी चे काम अडवण्याचे काम नगरसेविका आशा शेडगे करतातं : आयुक्त राजेश पाटिल

पिंपरी: मोघम तक्रारी करत नगरसेविका आशा शेंडगे यांनी त्यांच्या प्रभागातील स्मार्ट सिटीचे काम अडविले होते. .स्मार्ट सिटी अंतर्गत केबल टाकण्याचे काम शहरात चालू आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सर्व फाऊंडेशन केबल नेटवर्किंग आहे. कामाला विलंब झाला असून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत.मोघम तक्रारी करत स्मार्ट सिटी चे काम अडवण्याचे काम नगरसेविका आशा शेडगे करीत आहेत,भ्रष्टाचार होत असेल तर पुरावे द्यावेत. आम्ही ऐकत नसेल तर सीबीआय, एसीबी आहे. त्यांच्याकडे तक्रार करावी. एसीबीला पकडून द्यावे.अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटिल यांनी पत्रकार परिषेदेत दिली
त कालावधी निश्चित करुन सप्टेंबर अखेरपर्यंत कामे पूर्ण करुन ऑक्टोबरमध्ये स्मार्ट सिटीच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.काम वेळेत आणि लवकर पूर्ण केले जाईल असे कालच त्यांना सांगितलेअसे असताना आज त्या शाई घेऊन आल्या. त्यांना काय सिद्ध करायचे होते हे माहित नाही. हात लांबवून माझी केबिन बंद केली. नगरसेवक आहेत म्हणून कोणी आपले नोकर नाही. त्यांच्या प्रभागात अधिकारी काम करायला धजावत नाहीत. त्यामुळे त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचेही आयुक्त म्हणाले
.नगरसेविका आशा शेंडगे यांनी त्यांच्या प्रभागातील काम अडवून ठेवले होते. ते काम बुधवारी सुरु करण्यात आले. स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांनी त्यांची भेट घेऊन कमी वेळेत आणि लवकर काम करण्याचे आश्वासन दिले. कालही शेंडगे या माज्याकडे आल्या होत्या. त्यांच्याशी चर्चा झाली. काम थांबवू शकत नसल्याचे मी त्यांना सांगितले होते काल खोदलेले आज बुजून देखील टाकले. काम थांबवा, चर्चा करा आणि नंतर काम करा असे त्यांचे म्हणने होते. दीड वर्षे थांबलो. सर्वांत शेवटी हे काम हाती घेतले. त्यामुळे काम थांबवू शकत नसल्याचे मी त्यांना सांगितले. त्यांनी मोघम आरोप केले. काही पुरावे दिले. तर, निश्चितपणे चौकशी लावली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
. माझा रस्ता अडविला. तुम्हाला काही चर्चा करायची आहे का, बोलायचे का असे मी पुन्हा विचारले. पण, काम बंद करा, असे करा तसे करा म्हणत त्यांनी आरडाओरड केली. मग, भालकर यांच्या केबीनमध्ये गेले. तिथे काळे लावले. माझ्या नामफलकाला शाई लावली. आंदोलनाचे वेगळे मार्ग आहेत. भ्रष्टाचार होत असेल तर पुरावे द्यावेत. आम्ही ऐकत नसेल तर सीबीआय, एसीबी आहे. त्यांच्याकडे तक्रार करावी. एसीबीला पकडून द्यावे..
त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत अद्याप मी विचार केला नाही. त्यांच्या बाबत सर्व अधिकारी तक्रार करतात. त्यांच्या प्रभागात काम करण्यास अधिकारी धजावत नाहीत. प्रभागातून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. याचे त्यांनी नाही. त्यांना चर्चा करायची नव्हती. दुसरेच काही तरी करायचे होते, असेही आयुक्त पाटील म्हणाले.