नविन संशोधन अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने होत आहे……डॉ. डी. व्ही. जाधव

नविन संशोधन अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने होत आहे……डॉ. डी. व्ही. जाधवपीसीसीओईआरमध्ये आयईईईची आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

पिंपरी (दि. 14 सप्टेंबर 2021) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने नवनविन संशोधन होत आहे. नव संशोधकांनी विषय निवडताना ते संशोधन समाजातील शेवटच्या घटकाला देखिल अल्प वेळेत, अल्प खर्चात उपयोगी ठरेल असे निवडले पाहिजे. एक शाखीय संशोधनापेक्षा अनेक शाखेतील संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन केल्यास ते कमीत कमी वेळेस जास्तीत जास्त लोकांना उपयोगी ठरु शकते. कोरोनावर विकसित झालेल्या लस संशोधनात अनेक शाखांमधिल संशोधकांचे योगदान आहे असे प्रतिपादन तंत्र शिक्षण विभाग पुणेचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथिल पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे दोन दिवसीय ‘आयईईई तंत्रज्ञानातील नवकल्पनांची आशियाई परिषद 2021’ चे (IEEE Asian Conference on Innovation in Technology – ASIANCON – 2021) आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जाधव बोलत होते. यावेळी सीओईपीचे उपसंचालक डॉ. एम. एस. सुतावणे, आयईईईचे (Institute of Electrical & Electronic Engineers) तंत्र विभागाचे अध्यक्ष डॉ. चाणक्य कुमार, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, ज्येष्ठ संशोधक अहमद फौजी, ई ॲण्ड टिसी विभागाचे प्रमुख डॉ. आर. जी. मापारी, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीईटीच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या संचालीका डॉ. जान्हवी इनामदार, प्रा. विजयालक्ष्मी कुंभार आदी उपस्थित होते. या परिषदेत आशिया खंडातील बारा देशांमधिल अकराशेहून जास्त संशोधकांनी आपले शोध निबंध सादर केले होते. यापैकी 302 शोध निबंधांना प्रसिध्दी देण्यात आली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. जाधव म्हणाले की, नव संशोधकांनी कधीकाळी झालेल्या संशोधनाची पुनरावृत्ती टाळावी. आपला विषय, प्रयत्नांची दिशा, ठोबळ स्वरुप या विषयी प्रथम मांडणी करावी. संशोधनाची उद्दीष्ठे, ध्येय पक्के ठरलेले असावे. त्याला लागणारे साहित्य, सर्वेक्षणासाठी लागणारा वेळ, आवश्यक मनुष्यबळ, विश्लेषणाची प्रक्रिया, येणारा खर्च आणि त्याची उपयुक्तता याचा पुर्ण आराखडा प्रथम तयार करुनच संशोधनाकडे वळावे. तरच उपयुक्त आणि नवनवीन संकल्पना तयार होऊन सर्व सामान्यांना त्याचा उपयोग होईल आणि त्यातून रोजगार निर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळेल असेही डॉ. जाधव म्हणाले.मुख्य सत्रात प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, स्वागत प्रा. विजयालक्ष्मी कुंभार, सुत्रसंचालक प्रा. त्रिवेणी ढमाले आणि आभार डॉ. आर. जी. मापारी यांनी मानले.——-

Latest News