चाकण मध्ये विनयभंग तक्रारीची धमकी देत, 15 लाखा ची खंडणी…


पुणे : चाकणमधील नगरसेवक किशोर शेवकरी यांना विनयभंगाच्या तक्रारीची धमकी देत त्यांच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील चाकण पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे
एका महिलेला विनयभंगाची तक्रार दाखल करण्यास सांगितले आणि त्यानंतर चाकणचा माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, सामाजिक कार्यकर्ते आणि एका पत्रकाराने संबंधित नगरसेवकाकडे प्रकरण मिटवण्यासाठी 15 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.तडजोडीअंती बारा लाख रुपये किंवा पाच लाख रुपये सलोनी वैद्य हिच्या कॅन्सरच्या सर्जरीला खर्च करण्याची मागणी वेळोवेळी केली .
त्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हॉट्सअॅप चॅट तक्रारदाराने पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतम परदेशी, संगीता वानखेडे, कांतीलाल शिंदे, गीतांजली भस्मे, कल्पेश भोईर, संगीता नाईकरे, मंदा जोगदंड, प्रणित, कुणाल राऊत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी दोन आरोपींना चाकण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.