दिल्ली पोलिस,आणि यूपी ATS च्या पथका कडुन सहा दहशतवाद्यांना अटक…

नवी दिल्लीत (पोलिसांच्या स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने (up ats) 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सहा जणांपैकी दोन जणांना पाकिस्तानामध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध ( underworld) असल्याचं समोर आलं आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने या सहा जणांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे. स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त केली आहेत. अटकेची ही कारवाई दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे एक महिनापासून हे ऑपरेशन सुरू होते. स्लिपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू होत्या. या सहा जणांनी दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरून रेकी केली होती
देशभरात सण आणि उत्सवाचे वातावरण असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने संयुक्तपणे कारवाई करत 6 जणांना अटक केली आहे. स्पेशल सेलचे सीपी नीरज ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईबद्दल खुलासा केला आहे
.यातील पहिली अटकही महाराष्ट्रात करण्यात आली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून 2 जणांना दिल्ली आणि त्यानंतर उर्वरीत तिघांना यूपी एटीएससोबत कारवाई करून अटक करण्यात आली
. .
धक्कादायक म्हणजे, या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने या सहा जणांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे. हवालामार्फत या दहशतवाद्यांना पैसे पुरवण्यात आले होते, असंही ठाकूर यांनी सांगितले.
स्पेशल सेल, यूपी एटीएस यांच्यासह प्रयागराज इथं छापा टाकला. यावेळी सहा जणांना अटक केली आहे. प्रयागराजमधील करेली या भागात हे सहा जण लपून बसले होते. हे सर्व दशतवादी देशातील वेगवेगळ्या भागात घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या सर्वांना मोठा कट सुद्धा रचला होता. अनेक राजकीय आणि मोठ्या व्यक्ती या सहा जणांच्या लिस्टवर होते. पण, वेळीच स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेमुळे सर्व तपास यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.