दिल्लीतील पोलीस मुंबईत येऊन कारवाई करतातं,मग आपली फौज सरकारने केवळ 100 कोटी मोजण्यासाठी ठेवली काय…
मुंबई : नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन केलेल्या कारवाईनंतर भाजपनं मविआ सरकारवरटीका केली आहे. दिल्लीतील पोलीस येऊन मुंबईतील दहशतवाद्यांना अटक करतात, मग आपली फौज सरकारने केवळ 100 कोटी मोजण्यासाठी ठेवली आहे काय, असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे
. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून पोलिसांनी उघडकीला आणलेल्या दहशतवाद्यांच्या मॉड्युलवरून उलटसुलट चर्चा रंगली आहे उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकानं दिल्ली पोलिसांच्या साथीने 6 दहशतवाद्यांना नुकतीच अटक केली. या सहाजणांपैकी दोघांना पाकिस्तानात ट्रेनिंग देण्यात आलं होतं. पकडण्यात आलेल्या सर्व दहशतवाद्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचंही उघडकीला आलं होतं. विशेष म्हणजे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस इब्राहिम यानंही यात मदत केल्याचं स्पष्ट झालं होतं
यातील पहिली अटकही महाराष्ट्रात करण्यात आली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून 2 जणांना दिल्ली आणि त्यानंतर उर्वरीत तिघांना यूपी एटीएससोबत कारवाई करून अटक करण्यात आली. स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त केली आहेत. अटकेची ही कारवाई दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे एक महिनापासून हे ऑपरेशन सुरू होते. स्लिपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू होत्या. या सहा जणांनी दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरून रेकी केली होती.
सर्व दशतवादी देशातील वेगवेगळ्या भागात घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या सर्वांना मोठा कट सुद्धा रचला होता. अनेक राजकीय आणि मोठ्या व्यक्ती या सहा जणांच्या लिस्टवर होते. पण, वेळीच स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेमुळे सर्व तपास यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.